पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा तपास नियमानुसारच – गृहमंत्री

Share This News

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी नियमानुसार चौकशी होणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरण राज्यात सध्या चांगलेच गाजतेय. वनमंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणाशी जोडले गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण देखील तापले आहे. अशात पोलीस विभाग या प्रकरणाची योग्य चौकशी करीत असून नियमानुसार तपास केला जात असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितले. सोबतच विरोधक करीत असलेल्या आरोपात तथ्य नसून पोलीस योग्य तपास करीत असल्याचेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचा संसर्ग झाल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. उपचारानंतर आज गृहमंत्र्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली. रुग्णालयातून बाहेर आल्यावर आज गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत पूजा चव्हाण प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केलं.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.