पुढे ढकलेल्या गेलेल्या MPSC परीक्षांच्या तारखा आयोगाच्या वतीने जाहीर

Share This News

मुंबई . कोरोना आणि इतर कारणांमुळे पुढे ढकलेल्या गेलेल्या परीक्षांच्या तारखा आयोगानं जाहीर केल्या आहेत. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 चे आयोजन 14 मार्च 2021 रोजी करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च 2021 ला होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 ही 11 एप्रिल 2021 रोजी होईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

तीन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. नव्या वेळापत्रकाप्रमाणे या तीन परीक्षा मार्च आणि एप्रली महिन्यात घेण्यात येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. यावेळी कोरोना नियमांची काळजी घेऊन परीक्षांचे आयोजन केले जाईल, असं एमपीएससीकडून कळवण्यात आलं आहे.

कोरोना आणि मराठा आरक्षण स्थगितीमुळे परीक्षा पुढे ढकलल्या

दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता आज परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे राज्यात प्रतिष्ठेचं वलय असणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या होत्या. अनेक वर्षांपासून तयारी करत असलेले उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी या उमेदवारांकडून केली जात होती.

 #MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर, 14 मार्चला राज्यसेवा पूर्व परीक्षा https://t.co/hqKv3GF8Sh


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.