महाल झोन मध्ये ” आप ” चे मडका फोड आंदोलन

Share This News

नागपूर शहराला होत असलेल्या अनियमित आणि वेळी-अवेळी होणारा पाणीपुरवठा ह्या ज्वलंत प्रश घेऊन आम आदमी पार्टी चे मध्य नागपुर संघटन मंत्री श्री प्रभात अग्रवाल व नागपुर युवा आघाडी प्रमुख गिरीश तितरमारे ह्यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा ग्रस्त नागरिकांना घेऊन महाल झोन येथे मडका फोड आंदोलन करण्यात आले तसेच नियमित पाणीपुरवठा व सार्वजनिक नळ पूर्ववत सुरू करण्यात यावे ह्यासंबंधीचे निवेदन देण्यात आले.
मागील काही दिवसांपासून दसरा रोड महाल भागात आणि शहारामध्ये एक दिवसा आड पाणी पुरवठा होत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली पाण्याचा अल्प पुरवठा सुरू आहे. दसरा रोड महाल भागातील सार्वजनिक नळ महानगरपालिकेने बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांना सुरळीत आणि नियमित पाणी पुरवठा होत नसून नागरिकांची गैरसोय सुरू आहे. दुरुस्तीच्या नावाखाली अपुरा पाणी पुरवठा करून खाजगी टँकर नी पाणी पुरवठा करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे त्यामुळे अनेक नगरसेवक आणि अधिकारी मिळून पैस्यांचा गैरवापर करतांना दिसून येत आहे. ह्या सगळ्या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी महाल झोन मध्ये मडका फोड आंदोलन करण्यात आले.
ह्या आंदोलनात समस्यांग्रस्त नागरिक, आम आदमी पार्टी चे कार्यकर्ते मध्य नागपूर अध्यक्ष
लक्ष्मीकांत जी दांडेकर, मध्य नागपूर संगठन मंत्र प्रभात.के.अग्रवाल , शहर युवा अध्यक्ष गिरिश तितरमारे, विजय धकाते, दिपक भातखोरे आदी उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.