मराठा आरक्षणावरील स्थगिती अद्याप कायम, विरोधकांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुनावणी सुरु आहे. पण मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयानं तूर्तास नकार दिला आहे. यावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका केली आहे

कोर्टाची तारिख आल्यावर एक दिवस आधी वकिलांना बोलावलं जातं आणि आम्ही मराठा आरक्षणासाठी लढत आहोत, हे दाखवून आता चालणार नाही. मराठा समाजातील तरुणाई आता संतप्त झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारनं आता ठोस भूमिका घेणं गरजेचं असल्याचं मत दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. वकील मंडळी युक्तीवाद करतील. पण सरकार म्हणून काही निर्णय घेणं, सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडण्यात सरकार अपयशी ठरत आहे. मराठा समाजाच्या भरती प्रक्रियेबाबत राज्य सरकार दुसरा मार्ग काढू शकतं पण तसं होताना दिसत नसल्याचं दरेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.