2 वर्षांखालील बालकांवर कोरोना लसीची चाचणीची तयारी सुरू

Share This News

जगभरात कोविड-19 च्या लसीकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. काही देशात लसीच्या चाचण्या पूर्ण होऊन ती देण्यातही आली आहे. जगभरात जिथे 12 वर्षांवरील मुलांनाच लसीचा डोस देण्यात येत आहे, तिथे भारत बायोटेकने 12 वर्षांखालील मुलांवरही चाचणी यशस्वी केली.

आता, त्याचाच पुढचा टप्पा म्हणून 2 वर्षांखालील बालकांसाठी या लसीची चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीचे 20 दशलक्ष डोस तयार असून याच्या निर्मितीचा वेग वाढवला जाईल, अशी माहिती भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्ण इल्ला यांनी सोमवारी दिली.

फायझर लसीची चाचणी ऑक्टोबर महिन्यात 12 वर्षांच्या वरील मुलांवर सुरू झाली होती. तसेच मॉडर्ना लसीच्या चाचणीसाठी डिसेंबर महिन्यात 12 वर्षे आणि त्यावरील मुलांच्या चाचणीकरिता नोंदणी सुरू करण्यात आली आहे. भारत बायोटेक प्रथमच त्याहूनही लहान बाळांवर कोरोना लसीच्या चाचणीची तयारी करत आहे.

भारत बायोटेकच्या प्रयोगशाळेत 2 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्याबाबत नियोजन केले जात आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच यावर काम करणाऱ्या समितीद्वारे (सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीद्वारे) सादर केला जाईल. या लसीद्वारे कोरोनाचे निष्क्रिय स्वरुपातील विषाणु शरीरात सोडले जाणार आहेत.

या लसीची चाचणी व्हेरो सेल प्लॅटफॉर्मद्वारे केली जाणार असून याचे अनेक डोस तयार करण्यात आले आहेत. ज्याप्रमाणे पोलिओची लस नवजात बालकांनाही देता येते. साधारण त्याच प्रकारे 2 वर्षांच्या बालकांवर लसीची चाचणी केली जाणार आहे, असे सांगत अशी माहिती इल्ला यांनी दिली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.