राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी

जागतिक कोरोना संकटात  पंतप्रधान नरेंद्र मोदी  गुरुवारी  नवी दिल्लीतल्या  करिअप्पा मैदानावर एनसीसी-  राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख  बिपीन रावत आणि  तिन्ही दलांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यावेळी पंतप्रधान  नरेंद्र मोदी मानवंदना स्वीकारतील आणि एनसीसी छात्रांच्या संचलनाची पाहणी करतील.यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.  या संदर्भात आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,   ” राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्याला  भाग घेईल आणि संबोधितही करील .  राष्ट्रीय छात्र सेनेचा अनुभव अनोखा आहे ज्यात युवकांना विविध संधी आणि बरेच काही आपल्या युवकांना शिकायला मिळते. राष्ट्रीय छात्र सेना आपल्या भारताची विविधता आणि युवा शक्तिच्या प्रतिभेचे द्योतक आहे.  “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.