पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातीलसर्वांत लोकप्रिय नेते

जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत मिळवली लोकप्रियता

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते ठरले आहे. त्यांनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात मोदींना ७० टक्के गुणांकन मिळाले. दर आठवड्याला या सर्वेक्षणाचा डेटा अपडेट केला जातो.
पंतप्रधान मोदी मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या पुढे आहेत.
दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रौढांमध्ये सर्वात कमी असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. भारतात सर्वेक्षण केलेल्या प्रौढांपैकी २५ टक्के लोकांनी मोदींना नाकारले. मॉर्निंग कन्सल्टच्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदी गेल्या आठवड्यात सर्वेक्षण केलेल्या तेरा जागतिक नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. यावर्षीच्या जून महिन्यात त्यांचे गुणांकन ६६ टक्क्यांवर घसरले होते.
मॉर्निंग कन्सल्टच्या मालकीची पॉलिटिकल इंटेलिजन्स ही निवडणुका, निवडून आलेले उमेदवार आणि मतदानाच्या समस्यांवर रिअल-टाइम पोलिंग डेटा प्रदान करते. मॉर्निंग कन्सल्ट जागतिक स्तरावर ११ हजारहून अधिक मुलाखती घेते आणि अमेरिकेतील ५ हजार नोंदणीकृत मतदारांच्या अध्यक्षीय निवडणुकांबद्दल मुलाखती घेते. तर, भारतात सर्वेक्षणात सहभागी केल्या जाण्याऱ्या लोकांच्या ऑनलाइन मुलाखती घेतल्या जातात. प्रत्येक देशात वय, लिंग, प्रदेश, शिक्षण आणि काही विशिष्ट देशांमध्ये अधिकृत सरकारी स्त्रोतांवर आधारित सर्वेक्षण केले जाते.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.