कृष्णा नागरमुळे भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर : टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक संपादित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृष्णा नागरचे यांचे अभिनंदन आणि कौतुक केले.

ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” आपल्या बॅडमिंटन खेळाडूंना टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना पाहून आनंद झाला. कृष्णा नागरच्या उत्कृष्ट पराक्रमामुळे प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर हास्य उमलले आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. पुढील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. “

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.