केंद्रसरकार विरोधात आप चंद्रपुरची जटपुरा गेट येथे निदर्शने Protests against the central government at Jatpura Gate of AAP Chandrapur

Share This News

चंद्रपूर,दि.19ः– दिल्लीत राज्य सरकारच्या अधिकारावरून पुन्हा एकदा भाजपचे केंद्र सरकार, आप चे राज्य सरकार यात संघर्ष सुरु झाला आहे. राज्य सरकारचे अधिकार संकुचित करून नायब राज्यपालांकडे सर्वच प्रस्ताव दाखल करून मान्यता घेणे बंधनकारक करणारे सुधारणा विधेयक भाजप सरकारने लोकसभेत मांडले आहे. आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे अध्यक्ष रंगा राचुरे यांनी यास विरोध दर्शवत भाजप सरकार लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला आहे.

दिल्लीत या विधानसभेत भाजपचा धुव्वा उडवत आप चे सरकार सत्तेत आले. त्या नंतरच्या महानगरपालिका फेर निवडणुकीतही भाजपाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आप सरकारची नाकेबंदी करण्याचे धोरण भाजपा सरकार तयार करत आहे.

या पूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने असे आदेश काढत सर्व फायली नायब राज्यपालांकडे मान्यतेसाठी पाठवण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे मोहल्ला आरोग्य क्लिनिक व सीसीटीव्हीची अंमलबजावणी रखडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल व त्यांचे सहकारी यांनी नायब राज्यपाल यांचे घरीच धरणे धरले होते. सुप्रीम कोर्टाच्या विशेष बेंचने यात स्पष्टता आणत राज्य सरकारच्या प्रस्तावाना राज्यपालांची मान्यता जरुरी नाही. फक्त माहिती देणे पुरेसे आहे असे सांगितले होते. असे असताना केंद्र सरकारने नवा दुरुस्ती प्रस्ताव आणत लोकनियुक्त सरकारचे अधिकार काढून घेण्याची मोहीम सुरु केली आहे. आज दिल्लीतील सरकार याचा बळी ठरले तर उद्या हेच धोरण महाराष्ट्रासारख्या विरोधी सरकारे सत्तेत असलेल्या सर्वच राज्यांच्या अधिकाराची गळचेपी केली जाण्याची शक्यता दिसते आहे. केंद्रातील भाजपा सरकार हे लोकांचे अधिकार कमी करण्याचे व घटनेतील तरतुदी विरोधात काम करत आहे अशी खरमरीत टीका आप चे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली आहे.

निवडणुकीत प्रलोभने दाखवत, खोटी आश्वासने देत निवडून यायचे, तसे न झाल्यास दुसरे लॉक प्रतिनिधी पळवायचे आणि तेही न जमल्यास मागील दरवाज्याने अधिकार काढून घ्यायचे, गळचेपी करायची असे भाजप ची रणनीती असून आम आदमी पार्टी सर्व स्थरावर याला विरोध करेल.आज केंद्र सरकारच्या विरोधात जटपुरा गेट येथे तिव्र निदर्शने करण्यात आली यात  सुनील मुसळे चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, संतोष दोरखंडे जिल्हा सचिव सुनील भोयर संघटनमंत्री चंद्रपूर महानगरपालिका, राजू कुडे महानगर सचिव, बल्लारपूर शहर संयोजक रविकुमार पुप्पलवार, कोषाध्यक्ष आसिफ हुसेन शेख, सय्यद अश्रफ अली, ऍड. राजेश विराणी, मारुती धकाते, मधुकर राव साखरकर, योगेश आपटे, अशोक आनंदे, बबन कृष्णपल्लीवार,  दिलीप तेलंग, राहील बैग, अजय डुकरे,समशेरसिंह चव्हाण सुधाकर गेडाम, ऍड. प्रतिक विरानी,विनोद कुडकेलवार,वामन नंदुरकर व इत्यादि उपस्थित होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.