उपराष्ट्रपतींच्या हस्ते कोरोना मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन

हैदराबाद, 7 सप्टेंबर जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडूंनी सोमवारी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत नागरिकांसाठी एआयजी हॉस्पिटल द्वारा संकल्पित कोरोना मार्गदर्शक आणि प्रक्रिया पुस्तिकेचे प्रकाशन केले.

याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती नायडू म्हणाले ,” शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीने तसेच आधार युक्त उपचार नियमावली कोरोना विरुद्धची लडाई सुधृढ आणि तत्पर करेल. वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींसाठी एआयजी हॉस्पिटल द्वारा प्रस्तुत कोरोना मार्गदर्शक आणि प्रक्रिया पुस्तिकेचे प्रकाशन करून आनंद झाला. ” उपराष्ट्रपती सचिवालयाने ट्वीटर द्वारे ही माहिती दिली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.