पुणे – घरोघरी जाऊन शिक्षकांचा सन्मान, शिवराज लांडगे यांचा विधायक उपक्रम

पुणे, 5 सप्टेंबर – शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिवराज लांडगे आणि आमराई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने इंद्रायणी नगर परिसरातील शिक्षकांचा घरोघरी जाऊन सन्मान करण्यात आला. परिसरातील तब्बल १७६ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असून प्रत्यक्ष दारी येऊन मिळालेल्या मानवंदनेमुळे शिक्षकांकडून उपक्रमाबाबत आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या संकपनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार इंद्रायणी नगर प्रभाग क्रमांक ८ मधील १७६ म्हणजेच जवळजवळ सर्वच शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याबाबत माहिती देताना शिवराज लांडगे म्हणाले, बदललेल्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये आयुष्यभर पुरेल अशी ज्ञानाची शिदोरी आणि विद्यादानाचे कार्य शिक्षक करत असतात. हे व्रत यथायोग्य निभावणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे हे आद्य कर्तव्य आहे. त्याच अनुषंगाने हा उपक्रम राबवला. प्रत्येक शिक्षकाच्या घरी जाऊन सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. भविष्यात समाजासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान आणि अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यावर भर असणार आहे. दरम्यान या उपक्रमाचे शिक्षकांसह परिसरातील नागरिकांनीही कौतुक केले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.