राज्यसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी RS Meeting of BAC

नवी दिल्ली, 27  जानेवारी

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  आयोजित आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या  पार्श्वभूमीवर  राज्यसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक  शुक्रवार 29  जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. या बैठकीत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू  यांच्यासह संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, अर्जुन मेघवाल आणि राज्यसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित राहतील. यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन तसेच संबंधीत विधेयक, कार्यक्रम तसेच अन्य महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.  तर दुसरीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या  पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष   एम. व्यंकय्या नायडू यांनी  सभागृह नेत्यांची बैठक बोलाविली आहे.  रविवार 31 जानेवारी रोजी  आयोजित ही बैठकीत व्यंकय्या नायडू यांच्या निवासस्थानी म्हणजेच  उपराष्ट्रपती भवनात घेण्यात येईल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.