रामटेक मध्ये दोन दिवसांत ५१ हजारांवर दंडवसुली

Share This News

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता. आता प्रत्येक चौकात प्रशासन उभे राहून मास्क न लावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करीत आहे. अनेक नागरिकांकडून ५00 रुपये दंड आकरण्यात येत आहे. यात नगर परिषद उमरेड प्रशासन, पोलीस स्टेशनं उमरेड प्रशासन, पंचायत समिती उमरेड प्रशासन,तसेच तहसील कार्यलयाची विशेष चमू तयार करण्यात आली. जुने बसस्थानक, पोलिस स्टेशन चौक, बायपास चौक, भिसी नाका चौक येथे कर्मचारी दंडात्मक कारवाई करीत आहे. उपविभागीय अधिकारी हिरामण झिरवाळ यांचा मार्गदर्शनात तहसीलदार प्रमोद कदम, मंडळ अधिकारी सी. पी. साठकर, राकेश पोटवर, किरण यावलीकर, हर्षद हेलवटकर, टीना कापगते तसेच नगर परिषद कर्मचारी, पोलिस कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी यांनी मोहीम राबविली. कोरोनापासून उमरेड शहरातील जनतेला वाचविण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यापुढेही उमरेड प्रशासन आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करेल. पण, नागरिकांनीही काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी टाळावी, असे आवाहन वारंवार केले जात आहे. अनेकजण मास्क न घालताच सध्या वावरत आहेत. कोरोना अद्याप गेलेला नाही. त्यामुळे अशी ढिलाई परवडणारी नाही, पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेनं जायचं नसेल तर वेळीच सावध व्हा, शहरातील जनतेला खबरदारीचा इशाराच प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. कोरोनाची लस अजून आलेली नाही. त्यामुळे कोरोना संपला असे समजू नका. गर्दी वाढली की कोरोना वाढणार. त्यामुळे उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. अनेकजण मास्क वापरत नाहीत. काही ठिकाणी विनाकारण गर्दी होतोना दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून जनतेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल प्रशासनाने समाधान व्यक्त केले.
रामटेक शहरात दोन दिवसांत तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या नेतृत्वात विनामास्क फिरणार्‍या १0३ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ५१ हजार ५00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नागरिकांच्या निष्काळजी पणामुळे कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. कोरोना आपल्या आक्रमणासोबत पुन्हा कमबॅक करीत आहे. तेव्हा विशेष काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोविडच्या नियमांचे पालन सर्वांनी केलेच पाहिजेत. विनामास्क बाहेर फिराल तर १000 रुपये रुपये दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिला. कोरोनाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत काहीजण विनामस्क फिरताना दिसत आहे. तालुक्यात कोरोनाचा कहर पुन्हा वाढू नये, यासाठी रामटेक प्रशासन प्रयत्नात आहे.
विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करताना तहसीलदार बाळासाहेब मस्के यांचेसह नगर परिषदचे प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, महेंद्र जामगडे, प्रकाश बर्वे, विजय पडौले, शशिकांत मेर्शाम, मनोज चिंटौले, हर्षल वानखेडे, तहसील कार्यालय कर्मचारी टापरे व पोलिस कर्मचार्‍यांचा सहभाग होता.
पारशिवनीत एकाच दिवशी तीस हजारांचा दंड.
कोरोनाची पहिली लाट जात नाही तर दुसर्‍या लाटेने जगाला वेटीस धरले आहे. लॉकडाऊन हटल्याने नागरिकांनी बिनधास्त तसेच बेजबाबदारीने वागाला मोठय़ा प्रमाणात सुरुवात केल्याने शहरांसह गावखेड्यातसुद्धा रुग्ण आढळत आहे. पारशिवनी शहरातसुद्धा पहिल्या लाटेत बरेच रुग्ण आढळले होते. तरीसुद्धा शासनाचे निर्देश असतानासुद्धा नागरिक विनामास्क फिरताना दिसत असल्याने प्रशासनाच्या वतीने बुधवारी दंडात्मक कारवाई करून एकाच दिवशी ३0 हजारांचा दंड वसून करण्यात आला.
सतत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे जनसामान्यांचे जीवन धोक्यात आल्याने प्रशासनामार्फत सर्वच स्तरावरून उपाययोजना केल्या जात आहे. तरीही नागरिक गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क न लावता फिरत आहे. शासनाचे आदेश असताना नियमाची नागरिकांकडून पायमल्ली होत असल्याने कोरोना व्हायरसचा फैलाव होत आहे. परिणामी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने पारशिवनी तहसील कार्यालय, नगरपंचायत, पोलिस विभाग, पंचायत समिती यांनी संयुक्त कारवाई करीत बुधवारी (२५ नोव्हेंबर) सकाळी तहसीलदार वरुण कुमार सहारे, मुख्याधिकारी अर्चना वंजारी, खंडविकास अधिकारी, पोलिस विभाग यांनी संयुक्त कारवाई करीत अनेकांना दंड करीत मास्क न लावणार्‍यांकडून पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. दिवसभरात नियम न पाळणार्‍या नागरिकांवर कारवाई करीत ३0 हजार रुपयांच्या दंड वसूल करण्यात आला. कारवाई होत असल्याची वार्ता शहरात पसरताच अनेकांना पळता वाट सुधारत नव्हती. कारवाईच्या धाकाने बर्‍याच जणांनी चेहर्‍यावर मास्क लावले होते. तर शिवाजी चौक, गांधी चौक, सावनेर रोड येथे संयुक्त कारवाई करीत नियमाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.
कोरोना आजाराची सर्वपरी माहीती शहरात दिली आहे. नागरिकांना या आजाराच्या भयानकता माहीत आहे. तरीही बहुतांशी नागरीक निष्काळजीपणा करीत फिरत आहे. दंड व गुन्हा दाखल करणे हा उद्देश नसून नागरिकांचे आरोग्य तितकेच महत्वाचे आहे. पसरणारा आजार असल्याने प्रत्येक नागरिकांनी नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.
वेळोवेळी नगरपंचायत कार्यालयाने याबाबत जाहीर सूचना, दंवडी दिली असतानासुद्धा नागरिक निष्काळजी करून स्वत:सह दुसर्‍यांचे आरोग्य धोक्यात आणून शासनाचे निर्देश पायमल्ली तुडवत आहे. त्यामुळे या आजारावर मात करण्यासाठी नियमाचे पालन करणे गरजेचे असल्याने कडक कारवाई करणे गरजेचे आहे. तरीही नागरिकांनी परिस्थिती लक्षात घेऊन मास्क लाऊनच बाहेर पडावे. नियमाचे पालन करून शासनाला मदत करावी, असे आवाहन नगर पंचायतच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी केले आहे.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.