भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा

नवी दिल्ली : लडाखच्या पूर्व भागात असलेल्या पँगॉंग लेक परिसरावरून भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये समेट झाली असून, परस्पर सहमतीने सैन्य मागे घेतले जात आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. ते राज्यसभेत बोलत होते. (rajnath singh statement in rajya sabha on india china lac dispute) भारत आणि चीन सीमेवरील सद्यस्थितीबाबत राज्यसभेत सरकारने निवेदन द्यावे, अशी मागणी केली गेली होती. त्यानुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांनी भारत आणि चीन सीमेवर तोडगा निघाला असून, दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यास सुरुवात झाली आहे, अशी घोषणा यावेळी बोलताना केली. (india china lac dispute) सन १९६२ च्या पूर्वीपासून भारताच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणावाचा भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या संबंधावर प्रभाव पडल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.