नागपूर, पुण्याला दिले रेमडेसिवीर

Share This News

नागपूर
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून वर्धा येथील जेनेटिक लाइफ सायन्सेसमध्ये तयार होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आले आहे. हे वितरण प्रशासकीय यंत्रणा, सरकारी रुग्णालये आणि इतर वितरकांच्या माध्यमातून केले जात आहे. रविवारी पुन्हा नव्याने पुणे डेपो येथे १२,000 तर हेट्रो फार्मा, नागपूर डेपो येथे ६३0६ वायलचे वितरण करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यांना आतापर्यंत झालेल्या वितरणामध्ये अकोला – ११२७, अमरावती – १८२७, गोंदिया – २७७, भंडारा – १९९, बुलडाणा – १४७६, चंद्रपूर – ३८४, नांदेड – ११९२, परभणी – ६६८, यवतमाळ – १२९५, वाशीम – १८0, नागपूर – ३२0व रविवारचे ६३0६, हिंगोली – ३८४ यांचा समावेश आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.