अरुण गवळीसह पाच जणांचे अहवाल नॉर्मल

नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले होते. या सर्वांचे वैद्यकीय अहवाल नॉर्मल असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून पुन्हा कारागृहात हलवण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी अरुण गवळी व पाच बंदिवानांना कोरोनाची लागण झाल्याने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रारंभिक तपासणीअंती या सर्वांची ऑक्सिजन सॅच्युरेशन ९९-९८ टक्के असून सिटी स्कॅनही नॉर्मल आहे. त्यांचा ब्लड रिपोर्ट शनिवारी प्राप्त होणार असल्याने त्या सर्वांना पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले आहे. यापूर्वी जुलै महिन्यात कारागृहात बंदिवान, कारागृहातील कर्मचारी आदींना कोरोनाची बाधा झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.