रोहा एमआयडीसीतील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीवर नियंत्रण

रायगड, १२ नोव्हेंबर, : रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्‍यातील धाटाव एमआयडीसीतील सुदर्शन केमिकल लिमिटेड या कंपनीच्या डी.सी एल. स्टोअरेज प्लॅन्टला लागलेली आग आटोक्यात आली आहे. अथक प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. या आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे समजते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.एमआयडीसीतील सुदर्शन केमिकल लिमिटेड कंपनीच्या डी.सी एल. स्टोअरेज प्लॅन्टला मध्यरात्री आग लागली होती. आग इतकी भीषण होती की रात्रीत संपूर्ण परिसरात आगीचे लोट दिसून आले. आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन व रोहा नगर पालिका व एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर पूर्ण पणे नियंत्रण मिळविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.