जोशी जाणार, तिवारी येणार, नागपूरात भाजपा काय करणार?

Share This News

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सध्या बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपचे नागपूर महानगरपालिका महापौर संदीप जोशी आज (21 डिसेंबर) महापौरपदाचा राजीनामा दिला आहे.

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सध्या बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. संदीप जोशी आज (21 डिसेंबर) महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. आधीच ठरल्याप्रमाणे त्यांचा 13 महिन्यांचा कालावधी आज पूर्ण होत आहे. त्यामुळे ते राजीनामा देत आहे. यानंतर भाजपकडून महापौर पदावर भाजप नेते दया शंकर तिवारी यांना संधी दिली जाईल .

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरच महापौर निवडीच्यावेळी 13 महिने संदीप जोशी आणि 13 महिने दया शंकर तिवारी महापौर राहतील, असं सूत्र ठरलं होतं. त्याप्रमाणेच आता भाजपच्या पालिका सत्तेत खांदेपालट होत आहे. महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले.

तेलही गेलं, तूपही गेलं; आधी महापालिका निवडणुकीत माघार, आता संदीप जोशींनी पदवीधर मतदारसंघही गमावला

दरम्यान, गेल्या 55 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या (Nagpur Graduate Constituency Election) काँग्रेसने सुरुंग लावलाय. विधान परिषद निवडणुकीत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गड असलेल्या नागपुरातच भाजपचा पराभव झाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला खिजवून दाखवलं जातंय. मात्र यामध्ये भाजप उमेदवार आणि  (Sandeep Joshi) यांची सर्वात मोठी अडचण झाली.

अनिल सोलेंच्या जागी महापौरांना उमेदवारी

महापौर संदीप जोशींनी यापुढे कोणतीही महापालिका निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार अनिल सोले (Anil Sole) यांचं तिकीट कापून संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. परंतु जोशींना भाजपचा बालेकिल्ला राखता आला नाही. संदीप जोशी यांचा पराभव करत काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी (Abhijit Vanjari) मोठ्या फरकाने विजयी झाले.

महापालिका निवडणूक न लढवण्याची घोषणा

“आपण चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला आहात. यापुढे आपण पुन्हा निवडणूक लढवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी द्याल?” असा सवाल एका कार्यकर्त्याने संदीप जोशी यांना फेसबुक लाईव्हदरम्यान विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना संदीप जोशी यांनी यापुढे महापालिकेची निवडणूक लढवणार नसल्याचं 20 ऑगस्टला आपल्या वाढदिवशी स्पष्ट केलं होतं. (BJP Candidate Nagpur Mayor Sandeep Joshi left with no option after Nagpur Graduate Constituency Election defeat)

काय म्हणाले होते संदीप जोशी?

“अनेकदा नेत्यांनीच लढायचं आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलत राहायचं हे बरोबर नाही. मला वाढदिवसानिमित्त तुम्ही शुभेच्छा दिल्या आणि हा प्रश्नदेखील विचारलात. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी आज मी कॅमेऱ्यासमोर जाहीर करतो की, यानंतर मी महापालिकेची निवडणूक लढवणार नाही. माझ्यानंतरचा जो कुणी कार्यकर्ता असेल, जो पक्षासाठी मेहनत करतोय, तो कार्यकर्ता माझ्या जागेवर लढेल. मी त्याचं काम करेन. पण यापुढे महापालिकेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही”, असं संदीप जोशी म्हणाले होते.

तेलही गेलं तूपही गेलं

आता संदीप जोशी यांची अवस्था तेलही गेलं तूपही गेलं अशी झाली आहे. जाहीर घोषणा केल्यामुळे त्यांना आगामी नागपूर महापालिकेची निवडणूक लढवणं जिकीरीचं जाईल. विधानपरिषदेची संधीही गेल्यामुळे नगरसेवकपदाचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पुनर्वसनासाठी थेट विधानसभा निवडणुकीचा पर्याय असू शकेल.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.