सर्वाधिक पाऊस सांगलीत, सोलापूर दुसऱ्या स्थानी

सोलापूर 7 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्याचा सरासरी पाऊस सर्वाधिक असून सोलापूर सर्वात कमी आहे. या सरासरीची आकडेवारी शासन दरबारी गृहीत धरली जाते. याच आकडेवारीवर नजर टाकली असता सांगली जिल्ह्यात सर्वाधिक त्यानंतर सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सर्वात कमी पाऊस पुणे जिल्ह्यात नोंदवला आहे.पुणे विभागात कालपर्यंत सरासरी ८०७ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ७१९ मि.मी. म्हणजे ८९.१ टक्के पाऊस पडला आहे. मागील वर्षी ७२२.८ मि.मी. म्हणजे ८९.२ टक्के पाऊस पडला होता. यावर्षी अवघा ०.०१ टक्के पाऊस कमी आहे.सांगली जिल्ह्यात सरासरी ४०४ मि.मी पाऊस पडणे अपेक्षित होते प्रत्यक्षात ६१७ मि.मी. म्हणजे १५२.८ टक्के पाऊस पडला आहे. सोलापूर जिल्ह्यात ३४० मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना ४१५ मि.मी. म्हणजे १२२ टक्के इतका पाऊस पडला आहे. त्यानंतर सातारा, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात पावसाची नोंद झाली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.