सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं ध्वजवंदन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचाल डॉ मोहन भागवत यांनी गुजरातच्या कर्णावती मध्ये ध्वजवंदन केले. आज देशभरात गणतंत्र दिनाचा उत्साह आहे. सरसंघचालक डॉ मोहन भागवत हे गुजरातच्या कर्णावती मध्ये प्रवासात आहेत. आज सकाळी डॉ मोहन भागवत यांनी कर्णावती मध्ये ध्वजवंदन करून देशवासियांना गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सगळ्यांचा अंगीकार करणे,त्याग,सयंमपूर्ण जीवन जगणे तथा सतत कार्य करत सर्वत्र मंगल करायचे हे आपल्या देशाचे प्रयोजन आहे.सर्वांना जोडत आपल्या देशाला मोठे करायचं असल्याचं प्रतिपादन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी यावेळी केलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.