जेष्ठ इतिहासकार डॉ. भा रा अंधारे यांचे निधन

Share This News

डॉ. भा. रा. अंधारे यांचा जन्म 7 सप्टेंबर 1935 रोजी मध्य प्रदेशातील वाराशिवनी येथे झाला होता. नागपूरकर भोसल्यांचे इतिहासकार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी इतिहासात एम.ए., पीएचडी व डि. लिट. मिळवली होती. मॉरिस कॉलेज येथे प्रपाठक व इतिहास विभाग प्रमुख म्हणून त्यांनी लक्षणीय कामगिरी केली होती. अमरावती व नागपूर विद्यापीठाचे ते पीएचडीचे मार्गदर्शक होते. श्रीमती मीरा अंधारे सांस्कृतिक संग‘हालय व इतिहास संशोधन केंद्राचे ते संस्थापक संचालक होते. ‘बुंदेलखंडातील मराठी राजवट’, ‘1857 च्या समरांगणातील विरांगना व निवडक क्रांतीकारक’, ‘देवगडचे गोंड राजे’, ‘मराठी स्वराज्य ब्राम्हण पेशव्यांनी बुडवले काय?’ आदीसह सुमारे 20 ग्रंथ त्यांनी लिहीले आहे. ‘रमा राम कथा’ हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.