नागपूर : ते धाऊन आले ,आणि जगणे सोपे झाले

लॉकडाउनच्या काळात किन्नरांची परिस्थिती दयनीय होती. त्यांना दोन घास खायलाही मिळत नव्हते. त्यामुळेच काहींनी आत्महत्येचाही प्रयत्न केला. या दिवसांमध्ये आमच्या मदतीसाठी समाजातील जे घटक पुढे आले त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरणे शक्य नाही’, अशा शब्दांत किन्नर संघटनेच्या विद्या कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

करोना काळात किन्नर तसेच एलजीबीटी समुदायातील अन्य घटकांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागले, त्यावर हसमफर व

सारथी ट्रस्टतर्फे बुधवारी सदरमधील हॉटेल एलबी येथे चर्चासत्र आयोजित केले होते. त्यावेळी कांबळे बोलत होत्या.

‘लॉकडाउनमध्ये आमच्या उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली होती. यावेळी प्रसारमाध्यमांद्वारे लोकापर्यंत आमच्या व्यथा कळल्या व समाजानाने आम्हाला सढळ हाताने मदत केली’, असे कांबळे म्हणाल्या. अजूनही समाजात किन्नरांना स्वीकारार्हता नाही. मुलांना लहानपणापासून किन्नरांची भीती दाखविली जाते. त्यामुळे किन्नर दिसला तरी लहान मुले दूर पळतात. समाज स्वीकारत नसल्याने जे भोगावे लागते त्यामुळे किन्नर

‘बदल’ घडताना…

ट्रान्स मेन डॉ. भावेश जैन यांनी अनुभवकथन केले. लहानपणी आपण एक मुलगी होतो. मात्र, आपण चुकीच्या शरीरात आहोत, असे नेहमी वाटायचे. पुढे आपण शस्त्रक्रिया करून घेतली व आज एक पुरुष म्हणूनच आपण समाजात वावरत असल्याचे त्यांनी सांगितले. अशाच प्रकारे पुरुषातून स्त्री होण्याचा अनुभव आंचल वर्मा यांनी कथन केला.

चिडचिडे होतात, हे खरे आहे. मात्र, त्यांना एक सामान्य व्यक्ती म्हणून समाजाने स्वीकारले तर तेही तसेच सामान्य वागतील, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी सारथी ट्रस्टचे सीईओ निकुंज जोशी यांनी प्रास्ताविक केले. सारथी ट्रस्ट करीत असलेल्या कार्याविषयी त्यांनी माहिती दिली. संपूर्ण एलजीबीटी समुदायासाठी सारथीने आजवर काय- काय उपक्रम राबविले, याची सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे लेस्बियन, गे, किन्नर असणे म्हणजे नेमके काय, याविषयीही त्यांनी विस्ताराने सांगितले.

सारथीचे अध्यक्ष आनंद चांदरानी, सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर आदी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.