ज्योतिष्यविषयक व्याख्यानमालेला उदंड प्रतिसाद

नागपूर : पूज्य गुरू ए.व्ही. सुंदरम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ज्योतिष्यविषयक व्याख्यानमालेला चांगला प्रतिसाद मिळाला. महिला ज्योतिषी चर्चा समूहाच्या संस्थापिका ज्योतिषाचार्या डॉ. कीर्ती पाटील या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २५ व्याख्यानांच्या मालिकेत नागपुरातील बहुतांश ज्योतिष्य संस्था व अभ्यासकांनी सहभाग नोंदिवला. यात विशेषत्वाने त्रिस्कंध ज्योतिष्य फलादर्श मंडळ व कवि कुलगुरू कालिदास विद्यापीठ येथील सदस्यांचा सहभाग होता.

प्रसन्न मुजुमदार, विनय कुर्हेकर, राजन पानसे, राजन केळकर, चंद्रकांत गुंजीकर, दिनकर मराठे, शिरीष साठे, देवव्रत बूट, डॉ. विनिता फाटक डॉ. सुनिता जोशी, राज्यलक्ष्मी राव, अवंती पंचभाई, वंदना सातारकर, अनुराधा कुर्हेकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
विविध विषयांवर संशोधन करणारे तसेच नवा दृष्टिकोन ठेवून विषय मांडण्यात आले. डॉ. ज्ञानेश्वर कुलकर्णी, चंद्रशेखर शर्मा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. त्यांनी आपले समीक्षण नोंदिवले.

समारोपीय कार्यक्रमात लघु पाराशरी संकल्पना अप्रतिम विश्लेषण यावर आचार्य डॉ. कृष्णकुमार पांडेय, वैदिक ज्योतिष्यातील महत्त्वाचे सूत्र याबाबत चंद्रशेखर शर्मा, वर्गकुंडलींबद्दल डॉ. ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला ज्योतिषी चर्चा समूहातील राज्यलक्ष्मी राव, डॉ. कृपाली अंबुलकर, ज्योतिषाचार्या रश्मी कराळे, ज्योतिष्य अभ्यासक वसुंधरा काळबांधे, मनीषा गवळी, शालिनी यांनी सहकार्य केले. नवल शास्त्री गुरूजी यांनी स्तोत्रपठण केले. तांत्रिक सहकार्य उज्ज्वल पावले यांनी केले.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.