परभणीत इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन,दुचाकी हाताने ढकलल्या

Share This News

परभणीत इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेना पदाधिकार्‍यांनी इंधनावर चालणार्‍या गाड्यांना धक्का देत तसेच बैलगाडी मोर्चा काढत केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध करीत आंदोलन केले. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना दिलेल्या निवेदात, कोरोना संकटामुळे अनेकांच्या नोकरी, धंद्यावर गदा आली तर अनेकांचे रोजगार बुडाले परिणामी, अनेकांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरित कोरोनामुळे सर्वसामान्य माणसांच्या संसाराची घडीच विस्कटून गेली. संसाराची विस्कटलेली ही घडी नीट कशी बसवायची या चिंतेत असलेल्या देशातील सर्वसामान्य माणसासमोर इंधन दरवाढीमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. लवकरच पेट्रोल व डिझेलचे भाव शंभरी ओलांडतील आणि त्यामुळे आणखी महागाई वाढेल, या चिंतेने सर्वसामान्य माणूस ग्रासला जात आहे. इंधनाच्या भाववाढीमुळे सर्वत्र नाराजी पसरली असून केंद्र सरकारने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, दर कमी करावेत, अशी मागणी केली.
विशाल कदम, सुरेश ढगे, डॉ. विवेक नावंदर,दीपक बारहातेसह अनेक पदाधीकारी होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.