मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा

Share This News

शिवनेरी : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती किल्ले शिवनेरीवर शुक्रवारी साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी परिसरातील गर्दीवर यंदा प्रतिबंध घालण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष सरकारी हेलिकॉप्टरने शिवनेरी किल्ल्यावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी शिवपूजन व माँ जिजाऊ पूजन केले. त्यानंतर सुवासिनींच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्येक मराठी माणसावर अनन्य उपकार आहेत. महाराजांमुळेच मराठी मुलुखाचे स्वप्न साकार झाले. शिवाजी महाराज नसते तर मराठी लोकांचे आणि महाराष्ट्राचे काय झाले असते याची कल्पनाच न केलेली बरी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. महाराजांना जेवढा मानाचा मुजरा करावा, तेवढा कमीच आहे, असे ते म्हणाले.

शिवनेरी गडाच्या विकास कामात उंनिसबिस चालणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊन शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याची तयारी करण्यात आली आहे. शिवजयंती सोहळ्यासाठी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगडाही सज्ज झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तर होण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उपस्थिती लावली. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढे नतमस्तक होतो. प्रथेप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करतो, पण यंदा कोरोनाचे सावट असल्याने मर्यादीत साजरी करावी लागत आहे. नाईलाजाने निर्णय घ्यावा लागला. पण त्यामुळं बऱ्यापैकी कोरोना रोखता आला.

शिवनेरीच्या विकासाला दिलेल्या निधीबद्दलही त्यांनी माहिती दिली. शिवनेरीच्या विकासासाठी उद्धव ठाकरे आघाडी सरकारने २३ कोटी ५० लाखांची निधी दिला आहे. दिलेला निधी पोहचलाही आहे. त्यामुळे शिवनेरीचे पावित्र्य, महत्व लक्षात घेता शिवनेरीचा विकासासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. तसेच दिलेला निधी योग्य पद्धतीने वापरावा. अधिकाऱ्यांनी भान ठेवूनच काम करावं. कामात उंनिसबिस चालणार नाही, हे मी ठणकावून सांगतोय. असे दम अधिकाऱ्यांना भरला. महाविकास आघाडी सरकार कोणत्याही गोष्टीत कमी पडणार नाही याची मी खात्री देतो. असे ते म्हणाले.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, महाराजांच्या जीवनातील कोणताही प्रसंग घ्या, महाराजांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा आपण अभ्यास करा…त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हे स्वराज्याचं हित आणि जनतेचं कल्याण डोळ्यासमोर ठेवूनच घेतलेला होता हे लक्षात येईल, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून महारांजाची ओळख होती. शेतकऱ्यांच्या प्रत्येक हिताचे निर्णय आत्तापर्यंत महाराजांनी घेतले. शिवजयंती उत्साहात साजरी करायची असते याबाबत कोणाचंही दुमत नाही. पण सध्या करोना संकट आणि खासकरुन विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोलामध्ये करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री, गृहमंत्री मागच्या काळात करोनाच्या वेळी घराघरात फिरलेले आपण पाहिले, पण यावेळी त्यांनाही करोनाची लागण झाली आहे. मास्क वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे तसंच आपल्यासोबत इतरांचीही काळजी घ्यावी हेच सांगायचं तात्पर्य आहे,


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.