अमरावती : पेट्रोल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सारखी वाढ होत आहे. पेट्रोल ९१ रुपयांवर जाऊन पोचले आहे त्यामुळे सामान्य माणसाचं आर्थिक चक्र कोलमडले आहे. याच वाढलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दराविरोधात शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांच्या नेतृत्वात आज राजकमल चौक येथे विरोध प्रदर्शन व केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार तेलाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी झाली. केवळ निवडणुका असल्या तेव्हाच इंधनाचे दर काही दिवसांसाठी कमी करण्यात येतात व निवडणुका झाल्यानंतर या दरात वाढ करण्यात येते. आज झालेल्या या आंदोलनात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकही सहभागी झाले होते. या आंदोलनात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांप्रती जी टिपणी केली होती त्याचा निषेधही करण्यात आला व रावसाहेब दानवेंच्या पोस्टरचे दहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.