साहेब अर्धे तुमचे,अर्धे आमचे कंत्राटदाराची लोकप्रतिनिधी कार्यालयात आँफर

गोंदिया,दि.15ः गोंदिया जिल्हा परिषदेत गेल्या जून 2020 पासून लोकप्रतिनिधी नसल्याने सध्याचा कारभार हा प्रशासक स्वरुपात अधिकारी यांच्या मर्जीने सुरु आहे.त्यातच प्रशासक असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासनाच्या बाबतीत कडक आणि पारदर्शक भूमिका ठेवणारे असल्याने त्यांनी सर्वच विभागांची झडती घ्यायला सुरवात केली.तरीही बांधकाम विभागाच्या नियोजनातंर्गत सध्या अंगणवाडीसह व इतर बांधकामांना मंजुरी मिळाली असून गोंदियातील एका कंत्राटदाराने जिल्ह्यातील एका आमदार असलेल्या लोकप्रतिनिधीच्या कार्यालयात भ्रमणध्वनी करुन आपल्या मतदारसंघातील कामे अर्धे अर्धे करुन घेण्याची मागणी केली.सदर कंत्राटदाराने लोकप्रतिनिधीच्या कार्यालयातील व्यक्तीशी बोलतांना जेवढी कामे तुमची मंजूर आहेत,त्यापैकी अर्धे काम मला द्या आणि अर्धे तुम्ही ठेवा त्या कामांची सर्व प्रकिया करण्याची जबाबदारी आणि जिल्हापरिषदेतील अधिकार्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझी असल्याचे सांगत सरळ सरळ कामाची मागणी केल्याने त्या लोकप्रतिनिधीनेही संबधित कंत्राटदाराला लगेच फोनवर चांगलेच फटकारल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळासह त्या मतदारसंघातही सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.