सोलापूर :दगडखाणीतील पाण्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

Share This News

सोलापूर 14 डिसेंबर दगडखाणीतील पाण्यात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. ही घटना शेळगी परिसरातील थोबडे वस्तीजवळील लिंबोळे यांच्या दगडखाणीत रविवारी घडली. शिवराज संतोष डबरे (वय 12) व त्याची मोठी बहीण कल्पना संतोष डबरे (वय 14, दोघे रा. शेळगी) अशी मृतांची नावे आहेत. कल्पना ही घरातील कपडे धुण्यासाठी दगडखाणीमध्ये गेली होती. तिच्यासोबत भाऊ संतोष हा देखील होता. संतोष हा पाण्यामध्ये पोहण्यास उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. कल्पनाने वाचविण्याचा प्रयत्न केला. पण एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नांत दोघीही पाण्यात बुडाले. दगडखाणीजवळ दोघांना वाचविण्यासाठी कोणीही नव्हते. काही वेळानंतर मृतदेह पाण्यावर तरंगत होता. बाजूच्या शेतात काम करणार्‍याने पाहिले आणि त्यांच्या या घटनेची माहिती दिली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.