सोलापूर – ग्रामपंचायतीकडील थकीत वीज बिलाची रखडली चौकशी

सोलापूर 7 सप्टेंबर : ग्रामपंचायतीकडील थकीत वीज देयक, वीज वितरण कंपनीच्या मालमत्ता कराची ग्रामपंचायतीकडे थकबाकी, यासंदर्भात वीज वितरण कंपनी व ग्रामपंचायत, पंचायत समिती अधिकाऱ्यांमध्ये अद्याप समन्वय झालेला नाही. गटविकास अधिकारी व वीज वितरण कंपनीच्या तालुका प्रमुखांनी एकत्रितपणे चर्चा करणे व ग्रामपंचायतीच्या वीज बिलामध्ये समाविष्ट असलेल्या खासगी बिलाच्या चौकशीची प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान, थकीत वीज बिल वसुलीची सक्ती न करण्याबाबत शासनाचे परिपत्रक आले आहे. पण, थकबाकीची आकडेवारी संकलित करण्याची मोहीम प्रशासनातर्फे असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीकडील थकीत वीज बिलामध्ये इतर खासगी व्यक्ती, अास्थापनांच्याही देयकांचे समावेश झाल्याचे प्राथमिक तपासणीत पुढे आहे. ग्रामपंचायतींकडे नेमकी किती रक्कम थकीत आहे? हे निश्चित करण्यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्तीचे आदेश सीईआे स्वामी यांनी गेल्या महिन्यात प्रशासनाला दिले होते. पण, अद्याप त्यासंदर्भात काहीच ठोस निर्णय झाला नाही. पाच सप्टेंबरपर्यंत तालुकास्तरकावर पंचायत समिती व वीज वितरण कंपनीच्या खातेप्रमुखांनी एकत्रित बसून थकबाकीची आकडेवारी निश्चित करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात देण्यात आले होते. पण, अद्याप त्यासंदर्भात काहीच ठोस हालचाली प्रशासनातर्फे झाल्या नाहीत. त्यामुळे थकीत वीज बिलाचा मुद्दा पुन्हा रखडण्याची शक्यता आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.