सोलापूर : ग्रीन कॅम्पससाठी विद्यापीठास जागतिक स्तरावरील मानांकन

Share This News

 शाश्वत व पर्यावरणपूरक ग्रीन कॅम्पससाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास जागतिक स्तरावरील मानांकन जाहीर झाले आहे. इंडोनेशिया विद्यापीठाच्या पुढाकारातून दरवर्षी हा पुरस्कार जाहीर होतो. या मानांकनामुळे जागतिक स्तरावर सोलापूरचे नाव झाल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी म्हटले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कॅम्पस हजारो वृक्ष-वेलींनी बहरलेला आहे. निसर्गसमृद्धतेने संपन्न झालेल्या येथील ग्रीन कॅम्पसची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे.इंडोनेशिया विद्यापीठाकडून या मानांकनाचे प्रमाणपत्र विद्यापीठास प्राप्त झाले आहे. ग्रीन मेट्रिक वर्ल्ड युनिव्हर्सिटी-२०२० रँकिंगचे मानांकन मिळाले आहे.ग्रीन कॅम्पसमध्ये देशात २२ वा, पर्यावरण शिक्षणात १२ वा क्रमांक तर जगात ४८८ वा क्रमांक सोलापूर विद्यापीठाचा आहे. पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि हवामान बदल, कचरा, पाणी, परिवहन, शिक्षण आदी मुद्दे यामध्ये विचारात घेतले. पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. विनायक धुळप यांनी प्रस्ताव सादर केला होता. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.