राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी विदर्भांत

Share This News

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी सकाळी एक दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर विमानळावर पोहचल्यावर हेलिकॉप्टरने ते थेट भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाची पाहणी करणार आहेत. गोसेखुर्द धरणाचा घोडाझरी कालवा हा सिंदेवाही व मूल पर्यंत जाणार आहे या कळवायची मुख्यमंत्री ठाकरे पाहणी करणार आहेत. सोबतच राजीव टेकडी या पर्यटन स्थळ देखील मुख्यमंत्री भेट देणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरने मदत व पुनर्वसन मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी मतदारसंघात आगमन होणार आहे. गोसेखुर्द धरणासंदर्भात आढावा घेऊन तो लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या बाबतीत चर्चा व आवश्यक निधीबाबत ते चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.