खाद्यतेलाचा साठा जप्त

नागपूर
भेसळखोरांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) शासनस्तरावरून देण्यात आले आहे. या निर्देशानुसार एफडीएचे सहआयुक्त चंद्रकांत पवार (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी इतवारी परिसरात खाद्य तेलात भेसळ करणारे व ब्रँडेड खाद्यतेलाची नक्कल करून मिथ्थ्याछाप खाद्यतेल रिपॅकिंग करून विक्री करणार्‍या ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत ३ लाख ७२ हजाराहून अधिकचा भेसळ साठा जप्त करण्यात आला. तसेच ८ खाद्यतेलाचे नमुने विेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधित व्यापारी व विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. साहिल कुमार टी कंपनी, इतवारी, जगदिश ट्रेडिंग कंपनी, इतवारी, साईनाथ ट्रेडर्स इतवारी, गुरुदेव ट्रेडिंग कंपनी, इतवारी, लक्ष्मी ऑईल, इतवारी अशी कारवाई करण्यात आलेल्या प्रतिष्ठानांची नावे आहे. एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी, प्रफुल्ल टोपले, महेश चहांदे, अनंत चौधरी, यदुराज दहातोंड, अखिलेश राऊत व विनोद धवड यांनी ही कारवाई केली. या कारवाईत ३ लाख ७२ हजार २६0 रुपयांचा भेसळ साठा जप्त करण्यात आला. तसेच ८ खाद्यतेलाचे नमुने विेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.