निरोध वापराबाबत अजब नियम

कॅलिफोर्निया : सुरक्षित शरीरसंबंधासाठी निरोधचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. निरोध वापराबाबत अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात एक अजबच कायदा होणार आहे. शरीरसंबंधादरम्यान, जोडीदाराच्या सहमतीशिवाय निरोध हटवल्यास जोडीदारावर कारवाई करण्यात येईल. या कायद्याबाबत मागील काही काळापासून चर्चा सुरू होती. लवकरच या कायद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
एका वृत्तानुसार, असा कायदा तयार करणारे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिले राज्य असणार आहे. कॅलिफोर्नियाच्या आमदारांनी सात ऑगस्ट रोजी राज्यपालांकडे या कायदाचा मसुदा पाठवला आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.