नॅशनल हायवेवर पहिल्यांदाच उतरविले सुखोई; गडकरी, राजनाथ सिंह साक्षीदार

नवी दिल्ली : राजस्थानच्या जालोरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर इमर्जन्सू फिल्ड लँडिंगचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी, एअर चिफ मार्शल आर के एस भदौरिया आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत सहभागी झाली होते. पहिल्यांदाच सुखोई एस यू 30 एमकेआय लढाऊ विमान राष्ट्रीय महामार्गावर उतरविण्यात आले आहे.
‘सी 130 जे’ सुपर हर्क्युलस हे विमान राष्ट्रीय महामार्गावर उतरविण्यात आले तेव्हा त्यामध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह नितिन गडकरी, एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया हेसुद्धा होते. विमान महामार्गावर उतरवताच तिथे उपस्थित असलेल्यांना टाळ्या वाजवून आनंद साजरा केला. इमर्जन्सी धावपट्टीशिवाय कुंदनपुरा, सिंघानियासह तीन ठिकाणी भारतीय सैन्याच्या गरजेनुसार तीन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. यामुळे पश्‍चिमेकडील आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय लष्कराला मोठी मदत होणार आहे. ईएलएफचे काम हे 19 महिन्यांत पूर्ण करण्यात आले. जुलै 2019 मध्ये सुरु झालेलं हे काम जानेवारी 2021 मध्ये पूर्ण झालं होतं. आयएएफ आणि एनएचएआयच्या देखरेखीखाली जीएचव्ही इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने हे काम केले आहे. भारताच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हवाई दलासाठी इमर्जन्सी लँडिंगकरीता एनएच 925 ए वर तीन किलोमीटर धावपट्टी तयार केली आहे. याआधी ऑक्टोबर 2017 मध्ये हवाई दलाने लढाऊ विमानाचे लखनऊ आग्रा एक्सप्रेस वे वर मॉक लँडिग केले होते. त्यात कशा पद्धतीने महामार्गांवर आपत्कालीन स्थिती विमाने उतरविता येतील याचा अभ्यास करण्यात आला होता. लखनऊ-आग्रा हा एक्स्प्रेस वे राष्ट्रीय महामार्ग नसून तो उत्तर प्रदेश सरकारच्या अंतर्गत येतो.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.