‘मेयो’त महिला सुरक्षारक्षकाशी पर्यवेक्षकाचे अश्‍लील चाळे, शरीर सुखाची केली मागणी

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात (मेयो) सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला जवानाशी एका पर्यवेक्षकाने अश्‍लील चाळे करीत शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणी तक्रारीवरून पर्यवेक्षकाविरुद्ध तहसील पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. राजू विठ्ठल पाटील (वय 45) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पर्यवेक्षकाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 28 वर्षीय महिला महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळात कार्यरत आहे. ती मेयो रुग्णालयात सुरक्षेसाठी तैनात आहे. राजू हा तिचा सिनिअर असून तिला नेहमी त्रास द्यायचा. तिची छेडखानी करून काढून शरीर सुखाची मागणी करायचा. गेल्या काही दिवसांपासून ड्युटीवर आल्यानंतर तिच्याशी अश्‍लील चाळे करीत होता. त्यामुळे ती जवान त्रस्त झाली होती. त्यामुळे तिने तहसील पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून राजू याला अटक केली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.