रेल्वेच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

चंद्रपूर
रेल्वे रुळावर बसून मोबाईलवर बोलणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले. यात या शिक्षकाचा नाहक जीव गेला. ही घटना शिक्षक दिनाच्या दिवशी रविवारी रात्री घडली. मृतक शिक्षकाचे नाव चिरकुटा तुळशीराम खोब्रागडे (४५) रा. मूल असे आहे.
सदर शिक्षक मुल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या उथळपेठ येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी मूल पोलिस स्टेशनमध्ये र्मग दाखल करण्यात आलेला आहे. रविवारी रात्री ९.३0 चा सुमारास पंचशीलनगर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या मागील परिसरात राहणार चिरकुटा तुळशीराम खोब्रागडे (४५) रात्रीचे जेवण करून फिरण्याकरिता निघाले होते. घराच्या शेजारून गेलेल्या रेल्वे रुळावर कानामध्ये एअर फोन लावून फोनवर बोलत बसले. बोलण्यात ते इतके मग्र झाले होते की, रात्रीच्या सुमारास त्याच रेल्वे रुळावर येणार्‍या रेल्वेने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी परिसरात चर्चा आहे. चिरकुटा खोब्रागडे हे उथळपेठ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असून त्यांच्या पश्‍चात पत्नी व दोन लहान मुले आहेत.
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.