दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइनच होणार Tenth-twelfth exam will be offline only

मुंबई : वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. यावर अखेर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निरसन करीत दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय व अन्य महत्वाच्या सूचनांची माहिती शनिवार, २० मार्चला पत्रकारपरिषदेत दिली.
शिक्षणमंत्र्यांनुसार इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहे. त्यासंदर्भातील ट्विटही त्यांनी केले आहे. लेखी परीक्षेसाठी अधिकचा ३० मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. दहावी, बारावीची प्रात्याक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी साडेतीन तासांचा वेळ देण्यात आलेला आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.