१0 वी, १२ वीच्या परीक्षा होणार, वेळापत्रक लवकरच जाहीर

Share This News

देशात कोरोना व्हायरस या महामारीचा मोठा फटका विद्यार्थ्यांच्या परीक्षांना बसत आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येमुळे १0 वी आणि १२वीच्या परीक्षा रद्द होणार असल्याच्या चर्चा सर्वदूर पसरत होत्या. आता मात्र सीबीएसईने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी परीक्षांबद्दल वक्तव्य केले आहे. २0२१ या वर्षातील १0वी आणि १२वीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षांचे वेळापत्रक सीबीएसईडॉटएनआयसीडॉटइन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत. लवकरच परीक्षांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षांसंबंधी सीबीएसई अंतिम निर्णय घेणार असून वेळापत्रक देखील जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. बोर्ड सचिव अनुराग त्रिपाठी हे नवीन शिक्षण धोरण वेबिनारमध्ये बोलत होते.

     << Back to 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.