ठाणे महापालिकेचा ११ लाख उच्चांकी लसीकरणाचा टप्पा पूर्ण

ठाणे, ९ सप्टेंबर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महापालिकेने आजपर्यंत ५,०७,५४३ महिला, ५,९५,८११ पुरुष व ४१४ तृतीय पंथी असा एकूण ११,०३,३५४ उच्चांकी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण पार केला असल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे.

ठाणे शहरात आतापर्यंत २४,११७ आरोग्य कर्मचाऱ्यांना पाहिला तर १५, ८२७ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. फ्रंट लाइन कर्मचारी पैकी २७,४०७ लाभार्थ्यांना पहिला व १४,०५२ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून ४५ ते ६० वयोगटातंर्गत १,९१,७८७ लाभार्थ्यांना पहिला तर १,२५,५२९ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ६० वर्षावरील नागरिकांमध्ये १,४१,२११ लाभार्थ्यांना पहिला डोस व ८५,००७ लाभार्थ्यांना दुसरा डोस तसेच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांमध्ये ३,९८,२८४ लाभार्थ्यांना पहिला डोस तर ८०,१३३ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दरम्यान शहरातील ४५९ गर्भवती महिलांचे,८३ स्तनदा माता, ४१४ तृतीय पंथाचे आणि अंथरुणाला खिळून पडलेल्या २९ व्यक्तींचे देखील कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.