11 वा राष्ट्रीय मतदार दिवस (NVD) 25 जानेवारी 2021 रोजी होणार साजरा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे असतील. नवी दिल्ली येथील अशोक हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि माननीय राष्ट्रपती या समारंभाला उपस्थित राहतील. केंद्रिय कायदा आणि न्याय, संपर्क, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय मतदार दिवसाची यंदाची थीम `सक्षम, जागरूक, सुरक्षित आणि माहितगार मतदार`, त्यांना भविष्यात निवडणुकांच्या वेळी सक्रिय आणि सहभागी करून घेणे. कोविड 19 महामारीच्या काळात सुरक्षितपणे निवडणुका घेण्याबाबत ईएसआयच्या कटिबद्धतेवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस (25 जानेवारी 1950) म्हणून देशभरात 2011 पासून 25 जानेवारी रोजी दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे. राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात नवीन मतदारांचा गौरव केला जातो आणि त्यांचे मतदार ओळखपत्र (ईपीआयसी) त्यांना वितरित केले जाते.

या कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रपती 2020-21 या वर्षासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतील आणि ईसीआयच्या `हॅलो व्होटर्स` (नमस्कार मतदार) या वेब रेडिओला देखील प्रारंभ करतील. वेगवेगळ्या क्षेत्रात निवडणुका घेण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट निवडणूक आचरणाचा राष्ट्रीय पुरस्कार राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना प्रदान केला जाणार आहे. मतदारांप्रति जागृतीसाठी केलेल्या योगदानासाठी महत्त्वाचे राष्ट्रीय आदर्श, सीएसओ आणि माध्यम समूह या सारख्या महत्त्वाच्या भागधारकांचा देखील राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

ईसीआयचा वेब रोडिओ `हॅलो व्होटर्स` (नमस्कार मतदारहो) : ही ऑनलाइन रेडिओ सेवा मतदार जागृतीबाबतचे कार्यक्रम सादर करणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर या रेडिओसाठी लागणारी लिंक उपलब्ध असेल, त्या लिंकच्या माध्यमातून हा रेडिओ प्रसारित होईल. लोकप्रिय एफएम रेडिओ सेवेप्रमाणेच या रेडिओच्या हॅलो व्होटर्सच्या कार्यक्रमांची सादरीकरणाची पद्धत असेल, अशी कल्पना करण्यात आली आहे.

केंद्रिय मंत्री रवी शंकर प्रसाद ई – ईपीआयसी कार्यक्रमाचा प्रारंभ करतील आणि पाच नवीन मतदारांना ई – ईपीआयसी आणि मतदार ओळखपत्र प्रदान करतील. ई – ईपीआयसी हे मतदार ओळखपत्राचे एक डिजिटल रूप आहे. जे मतदार हेल्पलाइन अप्लिकेशन आणि https://voterportal.eci.gov.in/ आणि https://www.nvsp.in/. या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. निवडणूक आयोगाची काही प्रकाशने देखील या कार्यक्रमाच्या दरम्यान रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते प्रकाशित होतील.

महामारीच्या काळात निवडणुका घेणे- छायाचित्राच्या माध्यमातून एक प्रवास. महामारीच्या काळात निवडणुका घेण्याच्या आवाहनात्मक कामाचा प्रवास, त्यातील ठळक घडामोडी या फोटो बुकमध्ये पाहता येतील. आयोगाने देशात काही ठिकाणी निवडणुका अतिशय यशस्वीपणे या पद्धतीने पार पाडल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.