बाघनदी पात्रात बुडालेल्या चौघांपैकी तिघांचे मृतदेह मिळाले

गोंदिया,दि.08ः आमगाव तालुक्यातील कालीमाटी येथील वाघ नदीपात्रात चार युवक वाहून गेल्याची घटना मंगळवार, 7 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. संतोष अशोक बहेकार (19), रोहित नंदकिशोर बहेकार (18) मयूर अशोक खोब्रागडे (21), सुमित दिलीप शेंडे (16) सर्व रा. कालीमाटी ता. आमगाव अशी वाहून गेलेल्या युवकांची नावे असून यापैकी तिघांचे मृतदेह आज बुधवारला सकाळी शोधपथकाच्या हाती लागली आहेत.अजूनही एका युवकाचा शोध आपत्ती निवारण बचाव पथक घेत आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.