नागपूर : तीन संशयीत कोरोना बाधितांच्या मृत्यू प्रकरणी समिति करणार चौकशी

नागपूर
शासनाकडून मेडिकलमध्ये झालेल्या तीन संशयीत कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. याप्रकरणी शासनाकडून नव्याने समितीचे गठन केले आहे. ही समिती या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या समितीने चौकशीदेखील सुरू केली असून येत्या काही दिवसात चौकशी अहवाल येण्याची शक्यता आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ही समिती नेमली. या समितीत एम्सचे औषधीविज्ञान विभाग प्रमुख डॉ. प्रशांत जोशी, गोंदिया मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. नरेंद्र तिरपुडे, अकोला मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमागर घोरपडे यांचा समावेश आहे.
शुक्रवारी (ता. १५ जानेवारी) रोजी, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील (२४ वर्ष) युवक सकाळी दाखल झाला, शनिवारी (ता. १६ जानेवारी) रोजी, सिद्धार्थनगर कोराडी येथील (५६ वर्ष) वृद्ध संध्याकाळी तर रविवारी (ता. १७ जानेवारी) रोजी, महादुला येथील ( ६३ वर्ष) वृद्ध हे मध्य रात्रीनंतर दाखल झाले होत. उपचारासाठी ट्रामा केंद्रात आणल्यानंतर या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. परिणामी त्यांच्यावर कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभाग-१ मध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, या रुग्णांचा रविवारी (ता.१७ जानेवारी) रोजी, पहाटे ५ वाजेनंतर मृत्यू झाला. १६ जानेवारीला एका सुरक्षा रक्षकाला अतिदक्षता विभागात नलिकेतून गळती होत असल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात या सुरक्षा रक्षकांना वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर तडकाफडकी गळती सुधारण्यात आली होती. दरम्यान, रविवारी ऑक्सिजनचा पुरवठा काहीकाळ खंडित झाल्याने या रुग्णांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.