मतमोजणीला सुरुवात होऊन,विजयाचा घोष आज होणार

नागपूर
गत शुक्रवारी जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली.

जिल्ह्यात एकूण ७४.८९ टक्के मतदान झाले. तर सोमवार १८ जानेवारी रोजी तालुकास्तरावर सकाळी १0 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
सुरुवातीला जिल्ह्यातील १३0 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होणार होते. मात्र, कळमेश्‍वर तालुक्यातील सोनपूर व सावनेर तालुक्यातील जटामखोरा या ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाली. मतदार यादीतील घोळामुळे राज्य निवडणूक आयोगाने कुही तालुक्यातील देवळी कलाल या गावाची निवडणूक रद्द केली. त्यामुळे शुक्रवार, १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतीमध्ये मतदान झाले. जिल्ह्यातील ४८५ मतदान केंद्रावर एकूण ३,0१५ उमेदवारांमध्ये ही लढत रंगली. १२७ ग्रामपंचायतीच्या एकूण ४३१ प्रभागांपैकी ४११ प्रभागांसाठी हे मतदान झाले. एकूण १,१९६ जागांपैकी १,0८६ जागांवर प्रत्यक्ष मतदान झाले. यामध्ये एकूण ३,१७,२४७ मतदारांपैकी २,३७,५७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सर्वाधिक मतदान हे मौदा तालुक्यात ९0.७१ टक्के झाले. तर सर्वात कमी मतदान हे ५६.३८ टक्केनागपूर (ग्रामीण) तालुक्यामध्ये झाले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर सरपंचपदाची थेट निवडणूक रद्द करण्यात आली. त्यामुळे आता निवडून आलेल्या सदस्यांद्वारे सरपंच निवडला जाणार आहे. निकालानंतर काहीच दिवसात राज्य सरकारद्वारे सरपंचपदासाठीचे आरक्षण जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

नागपूर
गत शुक्रवारी जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात एकूण ७४.८९ टक्के मतदान झाले. तर सोमवार १८ जानेवारी रोजी तालुकास्तरावर सकाळी १0 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
सुरुवातीला जिल्ह्यातील १३0 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान होणार होते. मात्र, कळमेश्‍वर तालुक्यातील सोनपूर व सावनेर तालुक्यातील जटामखोरा या ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाली. मतदार यादीतील घोळामुळे राज्य निवडणूक आयोगाने कुही तालुक्यातील देवळी कलाल या गावाची निवडणूक रद्द केली. त्यामुळे शुक्रवार, १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतीमध्ये मतदान झाले. जिल्ह्यातील ४८५ मतदान केंद्रावर एकूण ३,0१५ उमेदवारांमध्ये ही लढत रंगली. १२७ ग्रामपंचायतीच्या एकूण ४३१ प्रभागांपैकी ४११ प्रभागांसाठी हे मतदान झाले. एकूण १,१९६ जागांपैकी १,0८६ जागांवर प्रत्यक्ष मतदान झाले. यामध्ये एकूण ३,१७,२४७ मतदारांपैकी २,३७,५७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. सर्वाधिक मतदान हे मौदा तालुक्यात ९0.७१ टक्के झाले. तर सर्वात कमी मतदान हे ५६.३८ टक्केनागपूर (ग्रामीण) तालुक्यामध्ये झाले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर सरपंचपदाची थेट निवडणूक रद्द करण्यात आली. त्यामुळे आता निवडून आलेल्या सदस्यांद्वारे सरपंच निवडला जाणार आहे. निकालानंतर काहीच दिवसात राज्य सरकारद्वारे सरपंचपदासाठीचे आरक्षण जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

टक्केवारी
काटोल ३ ८६.४२
नरखेड १७ ८१.४१
सावनेर ११ ६९.३६
कळमेश्‍वर ५ ७८.९६
रामटेक ९ ७६.९४
पारशिवनी १0 ८0.५७
मौदा ७ ९0.७१
कामठी ९ ७७.८७
उमरेड १४ ८५.१५
भिवापूर ३ ७९.0६
कुही २५ ८४.४२
नागपूर (ग्रा.) ११ ५६.३८
हिंगणा ५ ७७.0२
एकूण १२७ ७४.८९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.