राजस्थानच्या बाडमेरमधील राष्ट्रीय महामार्गावर उतरणार लढाऊ विमान

लॅण्गिंवेळी राजनाथ सिंह व नितीन गडकरी विमानात असतील

नवी दिल्ली : भारतीय वायूदलाचे एक विमान चालू आठवड्यात राजस्थानच्या बाडमेरमधील एका राष्ट्रीय महामार्गावर उतरणार आहे. यावेळी विमानात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे देखील असतील. वायूदलाच्या विमानांना आपत्त्कालीन स्थितीत उतरण्यासाठी तयार करण्यात आलेला देशातील हा पहिला राष्ट्रीय महामार्ग असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही केंद्रीय मंत्र्यांकडून बाडमेरमध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या ३.५ किमी लांबीच्या एका भागाचे उद्घाटन केले जाईल. महामार्गाचा हा भाग वायूदलाचे लढाऊ विमान आणि अन्य विमानांच्या आपत्त्कालीन लॅडिंगसाठी धावपट्टीप्रमाणे तयार करण्यात आला आहे. अशा प्रकारचा देशातील हा पहिला राष्ट्रीय  महामार्ग आहे, असे सूत्रांनी सोमवारी सांगितले. उद्घाटनावेळी वायू दलाचे एक विमान दोन्ही मंत्र्यांना सोबत घेऊन आपत्त्कालीन लँडिंगचा सराव करेल. यापूर्वी ऑक्टोबर २०१७ मध्ये वायूदलाचे जेट आणि परिवहन विमानांनी लखनौ-आग्रा एक्स्प्रेसवेवर लँडिंगचा अभ्यास केला होता.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.