शहरात हत्येच सत्र सुरूच

शहरात हत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे , पोलिस प्रशासन किंवा कायद्याची  भीति आरोपींमध्ये  राहिली की नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे , आज शहराच्या पांचपावली ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंचशील  नगर वाचनालय जवळ  देखील हत्येची एक घटना घडली आहे या घटनेत पुतण्यानेच आपल्या काका ची दारू च्या नशेत हत्या केलि आहे , अशोक मेश्राम अस मृत झालेल्या  व्यक्तीच नाव असून काल सकाळी त्याच पुतण्यासोबत काही कारणात्सव भांडण झाल होत दरम्यान काल मध्यरात्री बदला घेण्याच्या उद्देशातून दारू पिउन पुतण्याने अशोक यांच्या डोक्यावर काठीने वार करुण त्यांची हत्या केलि , पोलिसांनी आरोपिस ताब्यात घेतले आहे , पांचपावली पोलिस या घटनेचा पुढील तपास करित आहेत ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.