रामभक्तांच्या दान सहयोगातुन उभारले जाईल अयोध्येचे भव्य राम मंदिर

नागपूर : श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास च्या वतीने अयोध्येत तयार करण्यात येत असलेले राम मंदिर चे कार्य आता अधिक गतिमान करण्यात आलेले आहे , या मंदिर साठी आता लागणारा पैसा हा आता जनसामान्यातून गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे , १० रुपयांचे टोकन देऊन ही रक्क्म सम्पूर्ण देशातील रामभक्तांकडून जमविली जाणार आहे , अशी माहिती रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी दिली , आज शहराच्या प्रेस क्लब मध्ये आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते , प्रभु श्री राम यांचे भव्य मंदिर ३ माळयाचे असून प्रत्येक माळयाची ऊँची ही २० फुट असणार आहे , तर मंदिर ची ऊँची ही १६१ फुट असणार आहे , किमान १०८ फुट जागेवर यञशाळा , सतसंग भवन , संग्रहालय , अनुसंधान केन्द्र, आणि अतिति भवन उभारण्यात येणार आहे , या मंदिर साठी किमान १२०० करोड़ रुपयांची राशि लागणार आहे आणि ही पूर्ण रक्क्म रामभक्तांच्या दान सहयोगातुन तयार करण्यात येणार आहे ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.