सर्वात प्रभावी स्पुतनिक लशीची किंमत जाहीर, ९९५ रुपयांना मिळणार

Share This News

नवी दिल्लीः रशियाने विकसित केलेली कोरोनावरील स्पुतनिक व्ही या लसीची भारतातील किंमत जाहीर झाली असून ती भारतात ९९५.४० रुपयांना उपलब्ध होणार आहे.
भारतात वापरण्यासाठी मंजुरी मिळालेली ही तिसरी लस आहे. सुरवातीला ही लस आयात करण्यात येत असून आयात केलेल्या प्रत्येक डोससाठी लोकांना प्रत्येकी ९९५.४० रुपये मोजावे लागणार आहेत. ही लस सर्वाधिक म्हणजे ९१.६ टक्के परिणामकारक असल्याचा दावा रशियाकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. भारतात या लशीचे उत्पादन डॉक्टर रेड्डीज ही कंपनी करणार असून त्यांचा रशियाची करार देखील झाला आहे. भारतात उत्पादन सुरु झाल्याल लशीची किंमत आणखी कमी होऊ शकेल, असे बोलले जात आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.