पोलिस विभागाने गडचिरोलीतील ओबीसी महामोर्चाला परवानगी नाकारली

Share This News

गडचिरोली,दि.13ः गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी संघटनेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी कमी करण्यात आलेले आरक्षण १९ टक्के पूर्ववत करण्यात यावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी. यासह विविध मागण्यासाठी २२ फेब्रुवारीला शिवाजी कॉलेज धानोरा रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोलीपयर्ंत महामोर्चाचे आयोजन केले असून, या मोर्चाची परवानगी कोरोनाचे कारण पुढे करुन पोलिस विभागाने नाकारली आहे.
ओबीसी महामोर्चाची परवानगी मिळणेबाबतचे पत्र गडचिरोली पोलीस स्टेशनला सादर केले आहे. मात्र कोविड -१९ या संसर्गजन्य रोगाची साथ सुरू असल्याने राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याबाबत त्याचा पुर्व भाग म्हणून एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कार्यक्रमांना पुढील आदेश होईपयर्ंत परवानगी देण्यात येवू नये अशा शासनाच्या सूचना आहेत.
सदर महामोर्चाकरिता गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातून व गडचिरोली जिल्ह्यालगतच्या भंडारा, गोदिया चंद्रपुर जिल्ह्याच्या तालुक्यातील ओबीसी बांधव हजारोच्या संख्येने सहभागी होणार आहेत. ज्यामुळे सद्यास्थितीत प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने कोविड-१९ साथरोग परिस्थिती नियंत्रणात असुन भविष्यात सदर गदीर्मुळे मोठया प्रमाणावर कोविड परिस्थिती अनियंत्रित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोवीड या संसर्गजन्य रोगाची साथ सुरुच असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून २२ फेब्रुवारी रोजीचे महामोर्चाची परवानगी नाकारण्यात येत आहे. असे पत्र गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दामोदर मंडलवार यांनी मोचार्चे संयोजक महेंद्र ब्राम्हणवाडे यांना दिले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.