निवडणुकीत मते खाण्यातून सत्ता मिळत नाही, आठवलेंचा आंबेडकरांना टोला

अमरावती: निवडणुकीत मते खाण्याचे राजकारण करून सत्ता मिळत नसते. वंचित बहुजन आघाडीने मागील निवडणुकीत केलेला प्रयोग फसला व त्यांना एकही आमदार किंवा खासदार निवडणून आणता आलेला नाही, या शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर तोप डागली आहे.
आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे अशी आपली नेहमीच भूमिका राहिलेली आहे. पण, सध्यातरी ती परिस्थिती दिसत नाही. ते होणार असेल तर त्यात सहभागी होण्याची आणि कोणाच्याही नेतृत्वात काम करण्याची आपली तयारी असेल. प्रकाश आंबेडकरांशिवाय रिपब्लिकन ऐक्याला काहीच अर्थ नाही. ते सोबत येणार असली तर आमची तयारी आहे, असेही आठवले म्हणाले. सर्वच रिपब्लिकन गटांनी आणि त्यांच्या नेत्यांनी एका मंचावर येऊन रिपब्लिकन ऐक्याची ताकद उभी करणे आवश्यक आहे. एकट्याच्या ताकदीवर एकही आमदार निवडून येऊ शकत नाही. वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगातून काहीच साध्य झाले नाही. त्यातून केवळ मत विभाजनाचे काम झाले. त्यातून सत्ता मिळत नसते. कोणासोबत युती केल्याशिवाय सत्ता मिळणार नाही, असा टोलाही आठवले यांनी आंबेडकरांना लगावला.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.