भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करू द्यायचा कट पंतप्रधानांनी रचलाय – जयंत पाटील

वाशिम दि. ६ फेब्रुवारी, – आज देशात परिस्थिती फार वाईट आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही… कामगारांचे कायदे मोडून काढले जात आहेत… भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करून द्यायचा कट पंतप्रधानांनी रचला आहे असा आरोप करतानाच मोदींकडे पाहिले तर वाटतं राज्यकर्ते असे क्रुर कसे असू शकतात ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज दहाव्या दिवशी वाशिम जिल्हयात असून यावेळी वाशिम जिल्हयातील रिसोड विधानसभेचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या मतदारसंघात निवडणूक लढवते, ज्या मतदारसंघात लढवत नाही अशा दोन्ही मतदारसंघाला राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त भेट देत असल्याचे सांगताना आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभे करायचे आहे. सत्ता असो किंवा नसो आपल्या कार्यकर्त्यांचा जथा नेहमीच तयार पाहिजे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. शेतकरी आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मोदींनी पेट्रोल – डिझेलचे भाव वाढवले. चहूबाजूंनी जनतेला अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. परकीय लोक देशावर सत्ता गाजवत आहे असा भास होतो आहे असेही जयंत पाटील म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.